न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव :- दापोडी येथील एस.एस.पी शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी नुकताच साजरा करण्यात आला.
संस्थेच्या दापोडी येथील गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक व उद्योजक एस बी पाटील, माजी शिक्षण आधिकारी हरी भारती, संचालक गणेश पाटील, आकाश पाटील, नंदकुमार कणसे, मच्छिंद्र लंघे, तानाजी काटे, संतोष काटे, प्राचार्य डी एन घारे, राजेश व्हटकर, विश्वनाथ पाटील, अशोक पाटील आदींसह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थापक पाटील म्हणाले की, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मला स्वतःला शिकता आले नव्हते. त्यामुळे परिस्थितीची जाणीव असल्याने गोर-गरीब पालकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी व त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. स्थेतील प्राचार्य तसेच तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास वाव मिळाला. यापुढील काळातही विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
यावेळी विद्यार्थ्यानी विविध कार्यक्रम सादर केले. प्राचार्य घारे यांनी प्रास्ताविक केले.