न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून खरपूस शब्दात टीका केली आहे.
यात महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांना काडीमात्र किंमत नाही, केवळ काकांच्या पुण्याईने अजित पवार आजपर्यंत तरले आहेत, राष्ट्रवादीच्या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. या खोपडीस आम्ही म्हणजे शिवसेना किंमत देत नाही. अयोध्येत राम मंदिरास विरोध हेच अजित पवारांचे धोरण आहे. त्यांनी प्रभू श्रीरामाचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला आहे अशा स्वरूपाचे वक्तव्य केले आहे.
या जहरी टीकेला पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आक्षेप घेतला असून, सामना या वृत्तपत्राची होळी करण्यात आली आहे. अजितदादा आमचे दैवत असून त्यांच्याबद्दल कोणी तिर्हाईत व सत्तेची उब असलेल्या पक्षाने व त्या पक्षाच्या मुखपत्राने आपली लायकी पाहून टीका करावी , असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी म्हटले आहे.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विठ्ठल उर्फ नाना काटे, प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, अरूण बोऱ्हाडे, फजल शेख, महंम्मद पानसरे,नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, विजय लोखंडे, आनंदा यादव, वर्षा जगताप, प्रकाश सोमवंशी , गंगा धेंडे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, इम्रान शेख, गोरक्ष लोखंडे, शकुंतला भाट,प्रदीप गायकवाड, शशिकांत चौंडीकर, शिला भोंडवे, संजय लंके, शक्रुल्ला पठाण, अमोल भोईटे, रशीद सय्यद, हमीद शेख, निलेश पुजारी, राजेंद्र पवार, यशवंत शिंदे, बाळासाहेब पिल्लेवार, उत्तम हिरवे, संजय औसरमल, सचिन माने, प्रशांत देवकाते, सविता धुमाळ, मिनाक्षी उंबरकर, वर्षा शेडगे, आशा शिंदे, सविता खराडे, वंदना कांबळे, लालमहंम्मद चौधरी, गोरोबा गुजर, स्वप्निल डोळस, सचिन मोरे, अनिल चव्हाण आदींसह अनेक आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










