न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- व्यवसाय सुरू करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक मित्राने त्याच्या मित्राला २२ लाख रूपये दिले. पैसे न देता मित्र गायब झाला. हा प्रकार चिंचवड येथे नुकताच उघडकीस आला आहे.
बांधकाम व्यावसायिक विजय सोमनाथ दाते (वय-४०, रा. बळवंत कॉलनी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडूरंग भास्कार पाटील (वय-४०, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे हा पसार झालेला आरोपी एका राजकीय पक्षाचा माजी कार्यकर्ता होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दाते व आरोपी पाटील मित्र होते. आरोपी पाटीलने दाते यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी २०१५ पासून वेळोवेळी २२ लाख रूपये घेतले. फिर्यादी यांना पैसे न देताच आरोपी पाटील पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाते यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.










