न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- नगरसेवक शीतल शिंदे यांच्या वतीने गुरुवार (दि. २५. ऑक्टो.) रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहाशेजारील, जीवननगर, धोका कॉलनीतील प्रशस्त जागेत ‘शेतकरी आठवडा बाजाराचे” आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार, किफायतशीर किमतीमध्ये, ताजा भाजीपाला, फळे व अन्नधान्य या आठवडा बाजारातून ग्राहकांकरीता उपलब्ध करण्यात आली होती.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक अमोल देशपांडे, प्रमोद निसळ, महाराष्ट्र प्रदेश सचिव उमा खापरे, जयश्री गावडे, ज्येष्ठ मार्गदर्शक मधु जोशी यांच्या हस्ते उदघाटनाची नफीत कापून या आठवडे बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. दर गुरुवारी सायंकाळी ४ ते ९ या वेळेत या परिसरात हा शेतकरी आठवडे बाजार भरणार असू, दर गुरुवारी भाजी खरेदीबरोबर ‘लकी ड्रॉ’ मार्फत आकर्षक बक्षिसे नागरिकांना मिळविता येणार आहेत.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेवर आधारित तसेच श्री. छत्रपती शाहूराजे कृषी गट आयोजित यांच्या सहकार्याने हा आठवडे बाजार भरला आहे असून शेतकरी आठवडा बाजार हा नागरिकांना आरोग्यदायी जीवनाकडे नेण्याचे काम करेल.
एकीकडे मॉलच्या जमान्यात हरवत चाललेला आठवडे बाजार ही संकल्पना रुजवावी आणि शेतकरी व ग्राहकांची थेट भेट होऊन दोघांचाही फायदा व्हावा, या उद्देशाने शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना पुढे आली आहे, असे नगरसेवक शीतल शिंदे यांनी सांगितले.










