न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील एका भाजप महिला पदाधिका-याला भाजपच्याच भोर-वेल्हा तालुकाध्यक्षाने मोबाईलवर अश्लिल व्हिडिआे पाठवून विनयभंग केला आहे. ही घटना मागील दोन आठवड्यापासून घडली आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवडमधील ४० वर्षीय भाजप महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार भाजप भोर-वेल्हा तालुका अध्यक्ष आनंद देशमाने याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.