न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त आणि निवडणूक, भांडार विभागाचा पदभार असलेले सहायक आयुक्त डॅा. प्रवीण आष्टीकर एक महिन्याच्या प्रदिर्घ रजेवर गेल्यामुळे महापालिकेचे दैनंदिन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे.
आयुक्तांनी दिलेल्या आदेशानूसार आकाश चिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि ‘ड’ कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी विजय खोराटे यांच्याकडे निवडणूक विभागाची जबाबदारी दिली आहे. ‘फ’ क्षेत्रिय आणि आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
महापालिका प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडील क्रीडा विभाग कमी करण्यात आला आहे. प्रशासन अधिकारी असलेल्या ‘ह’ कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत यांच्याकडे क्रीडा विभागाची धुरा देण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहायक आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल केले परिपत्रकांत म्हटले आहे.