न्यूज पीसीएमसी नेटवर्क
औंध-बोपोडी :- वेणूवन विहार परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक शौचालयाचा मैला वाहून नेणारी पाईपलाईन नादुरुस्त होती. त्यामुळे दुर्गंधी पसरवून आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा त्रास होत होता.
नगरसेविका सुनीता वाडेकर अनेक दिवसांपासून महापालिकेकडे नवीन पाईपलाईन बसवण्याकरीता पाठपुरावा करीत होत्या. त्यांच्या या पाठपुराव्यास यश आले असून, महापालिकेने मैला वाहून नेणाऱ्या नवीन ड्रेनेज पाईपलाईनचे काम हाती घेतले असून ते पूर्णत्वास नेले आहे. तसेच वेणूवन बुद्ध विहाराच्या मागील बाजुच्या वस्तीमध्ये नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकून सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे.
परिसरातील नागरिकांची या त्रासातून सुटका झाल्यामुळे, नागरिकानी आनंद व्यक्त केला असून, नगररसेविका सुनिता वाडेकर यांचे आभार मानले आहेत. यावेळी या भागातील स्थानिक कार्यकर्ते अविनाश कदम, प्रवीण डोळस, भीमराव वाघमारे, आप्पासाहेब वाडेकर, डी. एस. गायकवाड आदी उपस्थित होते.