न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भंडारा :- शिवसेनेच्यावतीने सोमवार (दि.२९ ) रोजी विदर्भातील भंडारा येथे आगामी निवडणुकीसंदर्भात व जिल्ह्यातील संबंधित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस शिवसेना, युवासेना आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भंडारा व गोंदिया लोकसभा दौरा या संदर्भात तसेच २५ नोव्हेंबर ‘चलो आयोध्या’ मिशनसंदर्भात शाखाप्रमुख, बुथप्रमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली व याद्यांची पडताळणी करण्यात आली.
यावेळी भंडारा-गोंदीया जिल्हा संपर्कप्रमुख निलेशदादा धुमाळ, तिरोडा विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले, साकोली विधानसभा संपर्कप्रमुख मनोज कपोते, भंडारा विधानसभा संपर्कप्रमुख बाबा ठाकुर, जिल्हाप्रमुख मा. आमदार नरेंदर भोंडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.