न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कुदळवाडी :- चिखली कुदळवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी भंगार मालाच्या दुकानास लागलेल्या आगीमुळे परिसरातील भंगार व्यवसायिकांचे मोठे जान-मालाचे नुकसान झालेले आहे.
या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने कुदळवाडीत अग्निशामक विभाग, व्यापारी व नागरिक यांची आढावा बैठक घ्यावी, याकरीता स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी अग्निशामक विभागाचे प्रमुख किरण गावडे, महापौर राहुल जाधव, अतिरिक्त आयुक्त गावडे यांना लेखी निवेदन दिले आहे.
यात ‘येत्या काही दिवसात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. या परिसरात मागील काही वेळा आगीच्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत. या घटना पुन्हा घडु नये, यावर काय उपाययोजना करण्यात येणार आहेत? त्याची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी बैठक घेण्यात यावी. कुदळवाडीतील सर्व नागरिक, व्यापारी यांना या बैठकीसाठी निमंत्रीत करावे, अशी मागणी स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
चिखली कुदळवाडी परिसरात लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल. किरण गावडे (अग्निशामक विभाग प्रमुख)