न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाल्हेकरवाडी :- सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरातील चिंतामणी चौक येथे आज (दि. ३१) रोजी सकाळी ६.३० वा. ‘धावेल भारत, जोडेल भारत’ या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक शीतल शिंदे, नामदेव ढाके, शैलजा मोरे, उमा खापरे, क्रीडा सहा. आयुक्त आशा राउत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी पराग मुंढे व परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
सकाळी साडे सहा वाजता एकता दौड्ची सुरुवात झाली. स्पाईन रोड, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी ते भेळ चौक यादरम्यान एकता दौडचे आयोजन करण्यात आल्रे होते. यात विद्यार्थी, खेळाडू, युवक, युवती व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला, असे एकता दौड्चे आयोजक नगरसेवक नामदेव ढाके व शीतल शिंदे यांनी सांगितले.










