न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी :- आकुर्डी येथील समृद्धी फेज २ येथे निगडी शाखेचे चेअरमन व क्लब मेंबर मंगेश नारकर यांच्या ‘नारकर विमा सेवा केंद्राचे’ नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. एल. आय. सी. ऑफ इंडियाचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक (पुणे विभाग) बरूनकुमार खाँ यांच्या हस्ते उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला.
या उद्घाटनप्रसंगी विपणन प्रबंधक नंदा, निगडी शाखेचे मुख्य प्रबंधक पाटील, शाखाधिकारी (विक्रेय) बाळासाहेब हुले, विकास अधिकारी चंद्रशेखर पवार, राजेंद्र कोळी, श्रीकांत घोडके, मंगेश नारकर, नारकर बंधू व विमाधारक आदी उपस्थित होते.
यावेळी बरूनकुमार खाँ यांनी आकुर्डी परिसरातील विमाधारकांची विमा हप्ता भरण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली असून, विमा हप्ता भरण्यासाठी विमाधारकांनी या केंद्राचा उपयोग करावा, असे आवाहन केले.
नवीन विमा पॉलिसि काढणे, जुन्या पॉलिसीवर कर्ज, वारसदारांमध्ये बदल, जुनी पॉलिसि चालू करणे, तसेच नवीन विमाप्रतीनिधींची नेमणूक करणे आदी प्रकराची कामे या सेवा केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, असे मंगेश नारकर यांनी यावेळी सांगितले.










