न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरीतील मिलिंदनगर येथील कपिला वास्तू सोसायटीमध्ये शुक्रवार (दि. २. नोव्हें.) रोजी अज्ञात कारणामुळे आग लागल्याची घटना घडली आहे. यात सोसायटीच्या आवारात पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या सहा दुचाक्या जळून खाक झाल्या असून, एक ज्येष्ठ महिला व जवळपास ५ ते ६ रहिवाशी जखमी झाली आहेत.
आगीचे रौद्र स्वरूप इतके भयंकर होती की, त्याच्या लपेट्यातुन इमारतीचा चौथा मजलाही सुटू शकला नाही. या मजल्याच्या गॅलरीमध्ये ठेवलेले कपडे, दुचाकी आणि घरातील साहित्य असे एकूण चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. भागाबाई धर्मा गायकवाड (वय ७०), काका कांबळे, श्रीकांत कांबळे, अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सोसायटीतील मुलांनीच मागील भांडणाच्या रागातून हे कृत्य केले असून, असाच प्रकार मागील चार वर्षांपूर्वी घडला होता. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन या प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. इलेक्ट्रिक वायरचे शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहे.