न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे :- बहुजन नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना भुजबळ फार्म हाऊस, नाशिक येथील पत्त्यावर धमकीचे निनावी पत्र प्राप्त झाले असून, त्यात तुमचाही दाभोळकर-पानसरे करु अशी धमकी देण्यात आली आहे.
त्या निनावी पत्र पाठविणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन उच्चस्तरीय चौकशी व्हावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, याकरीता सामाजिक कार्यकर्त्या सपना माळी यांनी आंदोलन करीत, जिल्हाधिकारी कार्यालयात जावून निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
यावेळी महाराष्ट्र ओबीसी महासभा, अ. भा. महात्मा फुले समता परिषद, ओबीसी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र माळी महासंघ, भीम-आर्मी संघटना, ओबीसी सेवा संघ, माळी-धनगर ओबीसी समाजसेवा संघ, महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल आदी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी या सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनात विठ्ठल सातव, चंद्रकांत डोके, आनंदा कुदळे, काळुराम गायकवाड, सुरेश गायकवाड, सुनिता भगत, व्रुषाली शिंदे, मधुकर निरफराके, प्रितेश गवळी, मंजिरी धाडगे, शिवराम जांभुळकर, उमेश म्हेत्रे, राजेन्द्र नेवसे, आकाश ढोक, अविनाश चौरे, योगेश ढगे, पंढरीनाथ बनकर, विजय भुजबळ, प्रदिप बनसोडे, बंडु कचरे, पुंडलिक लव्हे, निलम गोरे, सुभाष रायकर, श्रेयस महाजन, सागर दरवडे, सुनिता शेलवंटे, प्रदिप दर्शले, नवनाथ कुदळे, जोती परदेशी,
आदी सहभागी झाले होते.
आंदोलनाचा समारोप प्रितेश गवळी यांनी केला.