न्युज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. ५. नोव्हें) :- नगरसेविका शारदा सोनवणे यांच्या पुढाकाराने व लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी सांगवी विभागाच्यावतीने जयंतीनिमित्त ३१ ऑक्टो. रोजी सांगवी परिसरातील शंभरहुन अधिक लहान दुकानदार, पानटपरी चालकांना मोफत डस्टबिन वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका शारदा हिरेन सोनवणे यांनी केले होते. यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, जवाहर ढोरे, धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, हिरेन सोनवणे आदी उपस्थित होते.