न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ५. नोव्हें) :- धानोरी उपनगराची वाढती लोकसंख्या व वाहतुकीची समस्या लक्षात घेउन, पुणे मनपाने त्वरीत उड्डाणपुलाचे काम सुरु करावे, याकरीता मनसेच्या वतीने सहा. अायुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.
या उड्डाणपुलामुळे धानोरी विश्रांतवाडी- कळस- तसेच आळंदी कडे जाणाऱ्या वाहतुकीची समस्या सुटणार असुन, यासाठी प्रशासनाने तात्काळ पाउले उचलले पाहिजे, असे मनसेचे प्रभाग अध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी मनसे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे प्रभाग अध्यक्ष गणेश पाटील (सर), अच्युतराव मोळावडे, अरुण येवले, सन्नी पंजाबी, रीयीज शेख, महेश राजगुरु, सतीश वानाेळे, महेश शिर्के, मनोज ठोकळ, गणेश कर्णे आदी पदाधिकारी व मनसैनिक उपस्थीत होते.










