न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ नोव्हें.) :- दिवंगत महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठान निगडी यांच्यावतीने सालाबादप्रमाणे दीपावली पाडवा सणानिमित्त भक्ती शक्ती समूहशिल्प निगडी येथे दीपोत्सवा चे गुरुवार (दि. ८ ) नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ .३० वाजता आयोजन केले आहे,
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, किरण चोपडा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत..
या वेळी १५००० दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत, कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये विद्युत रोषणाई, उडते आकाशदिवे, फटाक्यांची आतषबाजी, भव्य रांगोळी असणार आहे. दीपोत्सवाचे यंदाचे १७ वे वर्ष आहे,
कार्यक्रमाचे संयोजन दत्तात्रय पवळे, सुमनताई पवळे, संतोष कवडे यांनी केले आहे










