न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली :- चिखली येथील रिव्हर रेसिडेन्सी परिसरात रविवार (दि.४. नोव्हें.) रोजी अनधिकृत भंगार दुकाने व कारखाने यांच्या मधील टाकाऊ केमिकलयुक्त पदार्थ व केमिकलयुक्त कचऱ्यास मोठी आग लागली होती. त्यामुळे परिसरात सर्वदुर आगीच्या धुराचे डोंब पसरले होते व खुप मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदुषण झाले होते.
याबाबत स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलास योग्य वेळी माहिती दिली. त्यानुसार संततुकाराम नगर अग्निशामक विभागाचा एक बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाला. काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
या घटनेच्या पार्शवभूमीवर आज (दि. ५ नोव्हें) रोजी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तसेच महावितरणचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी आमदार लांडगे यांनी अपघातग्रस्त परिसराची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.










