न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके वाजवावेत. आवाज न करणारे फटाके वाजवावेत. आगीची घटना घडल्यास त्वरित अग्निशामक विभागाला कळवावे.
नागरिकांनी बालकांना वाजविण्यास देणेत आलेले फटाके मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली वाजवावेत. भुईनळे पेटविताना ते हातात न धरता जमिनीवर योग्य पध्दतीने ठेऊनच पेटवावेत. रॉकेट, फॅन्सी ऍटम वाजविताना, ते संबंधित पाकिटावर देणेत आलेल्या सुचनेप्रमाणे हाताळावे.
उंच जाणारे फटाके बाण, रॉकेट, फॅन्सी ऍटम घरे, इमारती, दुकाने इ. जवळ न वाजविता मोकळ्या पटांगणात वाजवावेत. आवाजाच्या तीव्रतेची मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. फटाके वाजविताना, आसपास मुबलक पाण्याचा साठा व वाळूचे बकेट्स ठेवावेत, आदी मार्गदर्शक तत्वांचे पालन करून सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे.










