न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१४ नोव्हें) :- लहुजी शक्तीसेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांनी लहुजी शक्तीसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुखपदी युवराज दाखले यांची नियुक्ती केली आहे.
मातंग समाजाच्या तसेच पिंंपरी चिंचवड शहरामधील बहुजन समाजाच्या हितासाठी सदैव कर्तव्यदक्ष राहण्याच्या सुचना देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत . युवराज दाखले हे शिवसेना तिरोडा विधानसभा संपर्कप्रमुख तसेच शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. या निवडीमुळे पिंपरी चिंचवड शहरामधील मातंग समाज व बहुजन समाजामध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे, मातंग समाजातील युवा कार्यकर्ते आकाश गायकवाड, दत्ता क्षिरसागर आदी उपस्थित होते.