न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हें.) :- पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे कंत्राट बीव्हीजी या कंपनीस दिले आहे. बीव्हीजी ही कंपनी भारतातील सेवा क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी असून, या कंपनीतील कर्मचारी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून साफ-सफाईची कामे करून घेत आहेत.
याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली असून, यात रुग्णालय आणि बीव्हीजी कंपनीसाठी ही बाब शोभनीय नाही, रुग्णांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे. रुग्णालय प्रशासनाने कंत्राटदार बीव्हीजी कंपनीवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.