न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हें.) :- महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाची फेररचना करण्यात आली असून, मंडळाच्या अध्यक्षपदी पुणे येथील रघुनाथ कुचिक यांची निवड झाली आहे.
मंडळात मालक आणि कामगार यांचे प्रत्येकी दहा सदस्य आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक आणि कामगार नेते केशव घोळवे यांची महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
कामगार प्रतिनिधी म्हणून राजेश गौतम, अॅड. शैलेश मुंजे, हरीश वाघ, प्रभाकर मते, राम साळगावकर, केशव घोळवे, सुशांत गायकवाड, हरी चव्हाण, दीपक ढाकणे, सुधाकर पाटील तसेच स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून विश्वेश कुलकर्णी, अॅड. श्रीधर व्यवहारे, अमित सुडे, विक्रम नागरे, प्रतीक घोडे यांची निवड करण्यात आली आहे.
सुबोध देऊळगावकर, राजेश दुबेवार, मकरंद देशपांडे, निरंजन परदेशी, राजीव सावरकर, निरंजन बोरसे, कन्हैयालाल शार्दूल, फईम पटेल, राजेश पेवल, योगेश मानधनी यांची मालक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.















