न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हें.) :- राज्याच्या नगरविकास विभागाकडील २३ मे २०१८ च्या अधिसुचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडील महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील सहसंचालक दर्जाच्या अधिका-यांना ‘मुख्य लेखा अधिकारी’ म्हणून प्रतिनियुक्तीवर भरण्याबाबत अधिसुचना देण्यात आल्या आहेत.
या आदेशाच्या अनुषंगाने सहसंचालक, लेखा व कोषागारे संवर्गातील अधिकारी यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये ‘मुख्य लेखा अधिकारी’ म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे. शासकीय आदेशानुसार महापालिका अस्थापनावरील ‘मुख्य लेखापाल’ या पदाचे नाव ‘मुख्य लेखा अधिकारी’ असे बदलण्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे.