न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर प्रतिनिधी (दि. १६ नोव्हें.) :- पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी सर्व प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात नृत्य, गायन, चित्रकला व इतर प्रकारात शाळेतील मुलांनी सहभाग घेतला. शाळेच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांसमोर वेगवेगळे मुखवटे परिधान करून, त्याद्वारे मुलांचे मनोरंजन केले व त्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
शाळेतील शिक्षकांनी बालदिन म्हणजे काय? त्याचे महत्व काय? याची माहिती अगदी सोप्या शब्दात सांगितली. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेछ्या दिल्या. यावेळी कार्यक्रमास शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर व शाळेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती कान्हेरे यांनी व आभार प्रदर्शन सुप्रिया कोमपेल्ली यांनी मानले.