न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. 17 नोव्हें) भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीतील कुदळवाडी येथे शुक्रवार (दि. 16) रोजी स्वि. नगरसेवक दिनेश यादव यांच्यावतीने ”होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, नगरसेविका साधना मळेकर, आश्विनी जाधव, स्वि. नगरसेवक सागर हिगंणे, सतोष मोरे, सामाजिक कार्यकर्त्या मंगल जाधव, सोनम जांभुळकर, जितेंद्र मेहता, दत्तात्रय मोरे, रामकृष्ण लांडगे, विजयराज यादव, गणेश यादव, लालचंद यादव, पाडुरंग बालघरे, रामभाऊ कोहीनकर, साहेबराव यादव, मनोज मोरे, दत्तात्रय बालघरे, बाळासाहेब मोरे, अंकुश यादव, आबा मोरे, पांडुरंग साने, सुरज गडसिंग, सुहास ताम्हाणे, दिपक घन, किशोर लोंढे, चद्रकांत जाधव तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार महेश लांडगे यांनी दिनेश यादव यांच्या महिलांसाठी आयोजित उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. महिलांना संसाराच्या रहाटगाड्यातून क्षणभर का होईना, विरंगुळा उपलब्ध करून, त्यांना सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत सामावून, त्यांचा सहभाग वाढवून मनोधैर्य वाढावयास हवे, याकरीता अशा कार्यकमास प्राधान्य द्यायला हवे, असे मत यावेळी आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात सहभागी विजेत्या महिलांना यावेळी बक्षिसे देवून गौरविण्यात आले. यात लकी ड्राॅ पैठणीच्या मानकरी शिल्पा कुंभार, वाॅशिंग मशिन विजेत्या शिला भोसले, टिव्ही विजेत्या वंदना पवार, कुलर विजेत्या वैशाली पाटणकर, सोन्याची नथ सारिका जाधव यांना देण्यात आली