न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हें) :- हिंदूहृदयसम्राट व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहरातील लाखो शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांना मानवंदना देण्यासाठी गेले आहेत.
शिवसेना राहटणी – काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने शिवसेना तिरोडा विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी आज (१७) रोजी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पहारअर्पण करून मानवंदना दिली. महाराष्ट्राच्या विधानभवनावर भगवा झेंडा फडकविण्यासाठी कटिबद्द राहण्याची शपथ घेतली.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, आशिष वाळके, रविकिरण घटकार, आमोल तेलंगे, दत्ता क्षिरसागर, सौरभ शेंडगे, नवनाथ जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.