न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हें) :- महाराष्ट्र नोटरी असोसिएशनच्या माध्यमातून ५ वे ‘महाराष्ट्र नोटरीज अधिवेशन’ रविवार (दि. २५ नोव्हें.) रोजी लोणावळा येथील कृष्णाई रीसोर्ट येथे होणार असल्याचे, पिंपरी चिंचवड नोटरीज असोसिएशनचे अध्यक्ष विधिज्ञ पी. डी. नांगरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या अधिवेशनात मुंबई हायकोर्ट न्यायाधीश, विधी खाते भारत सरकार यांच्यामार्फत कामकाजासंदर्भात सखोल ज्ञान व मार्गदर्शन केले जाणार आहे, जेणेकरून नोटरीप्राप्त वकिलांना दैनंदिन कामकाजासंदर्भात अडचणी व प्रलंबित ओळखपत्र मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी महाराष्ट्र नोटरी असोसिएशनचे सचिव अशोक वायदंडे यांचा नोटरी असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सर्व नोटरी प्राप्त वकिलांनी या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन, पिंपरी चिंचवड नोटरीज असोसिएशनचे अध्यक्ष पी. डी. नांगरे, उपाध्यक्ष दीपक ओव्हाळ, सेक्रेटरी सुर्यकांत सावंत यांनी केले आहे.