न्यूज पीसीएमसी नेटवर्क
औंध-बोपोडी (दि. २१ नोव्हें) :- गेल्या अनेक दिवसांपासून ३८, औध रोड, भाऊ पाटील पडाळ वस्ती या परिसरात सार्वजनिक शौचालयाचा मैला वाहून नेणारी पाईपलाईन नादुरुस्त होती. त्यामुळे दुर्गंधी पसरवून आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत होता.
नगरसेविका सुनीता वाडेकर यांच्या पाठपुराव्यास यश आले असून, महापालिकेने मैला वाहून नेणाऱ्या नवीन ड्रेनेज पाईपलाईनसाठी निधी मंजूर केला असून, सोमवार (दि.१९) रोजी नगरसेविका सुनीता वाडेकर यांच्या हस्ते या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला.
कार्यक्रमास रिपाइंचे पुणे शहर उपाध्यक्ष रोहित अडसूळ (गुरुजी), अविनाश कदम, संदीप गायकवाड, आप्पासाहेब वाडेकर, प्रदीप कांबळे, मुकादम चंद्रकांत साठे, मारुती भालेराव, संतोष खरात, ग्यानबा शिंदे, अंकुश ओव्हाळ, चंदू कांबळे, किसन गायकवाड, रविंद्र नितनावरे, अण्णा आठवले, योगेश चावऱ्या, विलास जाधव तसेच परिसरातील नागरिक व महिला कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.