न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हें) :- अ आणि फ प्रभाग जुलूस समितीच्या वतीने महम्मद पैगंबर जयंती( इद ए मिलादुन्नबी) मोठ्या उत्साहात निगडी येथे साजरी करण्यात आली. जकात नाक्याजवळ मौलाना फैज अहमद फैजी यांनी कुराण पठण करून पैगंबर यांच्या जीवनचरित्रावर प्रवचन दिले. यावेळी अ आणि फ जुलूस समितीचे अध्यक्ष आलम उर्फ बाबा शेख,सचिव मकबूल शेख,फिरोज सय्यद,बाबा इद्रिस,नासिर शेख आदी मौलवी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
या नंतर निगडी ते पिंपरी चौक या दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी निगडी, आकुर्डी, चिंचवड, देहूरोड, डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत, रुपीनगर, त्रिवेणीनगर या परिसरातील १२ मस्जीदचे अध्यक्ष यांच्यासह सुमारे ६-५ हजार मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आलेल्या मुस्लीम बांधवांना खीर चपातीचे वाटप करण्यात आले स्व. बाबा शेख यांनी सुरू केलेला हा उत्सव गेली ३० वर्षापासून अविरतपणे सुरू आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेविका सुमन पवळे, संजय बोऱ्हाडे, बापू घोलप, झीशान सय्यद, सलीम शिकलगार, जुलुस समितीचे अध्यक्ष बाबा शेख व आदी मान्यवर उपस्थित होते.
निगडी गावठाणमध्ये दिवंगत महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठानच्या वतीने पिण्याच्या पाणीबाटल्याचे वाटप करण्यात आले. निगडी यंग सर्कलच्यावतीने सहभागी झालेल्या सर्व मुस्लीम मंडळ प्रमुखांना सन्मानित केले.