न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हें) :- निगडी-आकुर्डी येथे जन अधिकार संघटना व पिंपरी चिंचवड सलमानी जमात संघटनेच्यावतीने महम्मद पैगंबर (इद ए मिलादुन्नबी) जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघटनेच्यावतीने आकुर्डीतील बजाज कंपनीलगत उत्सवात सहभागी नागरिकांना चहा, बिस्लरी पाणी, बिस्कीट, वडापाव आदी खाद्य-पदार्थांचे वाटप करण्यात आल्याचे अध्यक्ष मजीद शेख यांनी सांगितले.
यावेळी एड. सुशीलकुमार डूमने, मजीद शेख, एड. बी. के. कांबळे, मगूल शेख, मुन्ना शेख, नसीम सलमानी, सईया शेख व आदी सहभागी झाले होते. आभार प्रदर्शन कारी मौलाना शमसत यांनी केले.