न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नाशिक (२२ नोव्हें) :- शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांच्याजागी राधाकृष्ण गमे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अद्याप बदलीबाबत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही, असे तुकाराम मुंढेंनी सांगितले आहे.
तुकाराम मुंढे यांच्या शिस्तबद्ध, नियमाधारित कामांच्या दंडकामुळे नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्नही सत्ताधारी भाजपाने केला होता मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले होते. तुकाराम मुंढे यांनी नियमावर बोट ठेवत काम सुरुच ठेवले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या होत्या.