न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हें) :- रिक्षा चालक-मालकांसाठी परिवहन खात्याच्या अंतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, ओला उबेरसह बेकायदेशीर वाहतूक बंदकरण्यात यावी, इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करावे, मुक्त रिक्षा परवाना बंद करण्यात यावा, प्रत्येक आर. टी. ओ कार्यालयात २५० मीटरचा पासिंग ट्रॅक उभारावा, नवीन रिक्षाची ब्रेक टेस्ट बंद करण्यात यावीया सह इतर विविध मागण्यासाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व आर. टी. ओ कार्यालयात एकाच वेळी (दि. २७ नोव्हें) रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी शासनास निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीचे महाराष्ट्र सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली आहे.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरपुतळा येथे सकाळी १० वा. व पुणे आर. टी. ओ. कार्यालयासमोर दुपारी १२ वा. आंदोलन करून पिंपरी चिंचवड आणि पुणे आर. टी. ओ अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, बीड या जिल्ह्याचा दौरा बाबा कांबळे यांनी केला असून, या मुळे रिक्षा चालकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. सर्वच जिल्ह्यात तिव्र आंदोलन होणार असून मागण्या मान्य न झालास रिक्षा बंद सारखे तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले आहे.










