न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हें) :- महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमीत्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवार (दि. २५ नोव्हें) रोजी स. १० ते सायं.६ पर्यंत, पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात कै.चव्हाण यांच्या संदर्भातील विविध वृत्तपत्रांतील लेख, अग्रलेख यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
माजी नगरसेवक व साहित्यिक श्री अरुण बोऱ्हाडे यांनी कै. यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर (नोव्हेंबर १९८४) महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेले अग्रलेख, तसेच त्यानंतरच्या काळात अनेक मान्यवरांनी लिहीलेले लेख आणि आठवणींचा संग्रह केला आहे. माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होणार असून, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार आण्णा बनसोडे, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.















