न्युज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी (दि. २७ नोव्हें) :- दापोडीतील भारतीय जनता पक्षाच्यावतीने नरवीर तानाजी चौक परिसरात सोमवार (दि. २६) रोजी संविधान गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध सामाजिक उपक्रमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पूजन करून, कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिक व कार्यकर्ते यांना संविधान प्रत देऊन भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शहर सचिव विशाल वाळुंजकर, प्रभाग अध्यक्ष धर्मेंद्र क्षीरसागर, राकेश शिवशरण, ओंकार जगताप यांनी केले होते.
यावेळी भाजपा शहर सचिव विशाल वाळुंजकर, सामाजिक कार्यकर्ते सतीश मठपरधी, सतीश जाधव, प्रदीप वाळुंजकर, नारायण पांचाळ, दत्ता भाऊ काची, भाऊसाहेब भंगाळे, प्रभाग अध्यक्ष धर्मेंद्र क्षीरसागर, राकेश शिवशरण, ओंकार जगताप, विशाल सातपुते, राज मिश्रा, सुधीर चव्हाण, अमीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपचे शहर सचिव विशाल वाळुंजकर यांनी मोदी सरकार स्थापन झाल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व विकासाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. भाजपच्या सत्ताकाळात सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली. स्टार्टअप इंडिया, मुद्रा लोन, उज्वला गॅस, प्रधानमंत्री घरकुल योजना, इंदू मिल येथील स्मारक, भीम ऍप, लंडन येथील स्मारक, आंबवडे येथील बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव दत्तक घेतले असल्याचे वाळुंजकर यांनी उपस्थितांना सांगितले.
अमीर शेख यांनी संविधान वाचन केले. सूत्रसंचालन विशाल सातपुते, प्रास्ताविक राज मिश्रा यांनी तर आभार सुधीर चव्हाण यांनी मानले.

















