- न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी प्रतिनिधी :- गेली अनेक दिवसांपासून ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २७ रहाटणी – काळेवाडी मधील श्रीनगर परिसरातील जय भवानी चौकातील पाण्याचा वॉल नादुरुस्त आहे. महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयात याबाबत अनेक पत्रव्यवहार करूनसुद्धा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष दिले नाही.
त्यामुळे या परिसरातील रस्त्यावर पाणी साचून साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे व आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडीही होत आहे.
त्यामुळे आयक्त साहेब आपण गांभीर्याने या गोष्टीची दखल घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या प्रशासनाला तात्काळ पाण्याचा वॉल दुरूस्तीचे आदेश द्यावेत असे शिवसेना राहटणी-काळेवाडी विभागाचे प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.










