न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव : येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्या प्रयत्नातून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्यातील धारूर, चिंचोली, बिंजनवाडी सोनारी, निजाम जावळा येथे जाळीसह वृक्षलागवड करण्यात आली.
तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील पिंपळे गुरव, मरकळ गाव, भंडारा डोंगर येथेही वृक्षांची लागवड करण्यात आली. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे मागिल महिण्यात पाचशे रोपांची लागवड करण्यात आली. ही रोपे स्वयंभू होईपर्यंत ट्रस्टमार्फत त्यांची निगा राखण्यात येते. या रोपांना नुकताच बाम्बूच्या काट्यांचा आधार देण्यात आला आहे. जेणेकरून जोरदार वार्यामुळे रोपे वाकून त्यांचे नुकसान टळण्यास मदत होईल.
चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या सात वर्षापासून प्रतिवर्षी किमान एक हजार वृक्षांची लागवड केली जाते. एवढेच नाही, तर ही रोपटी जगली पाहिजेत, म्हणून रोपट्याचे वृक्षात रुपांतर होण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी ट्रस्टमार्फत घेतली जाते. जास्तीत जास्त वृक्षाची जाळीसह लागवड केली जाते. तसेच वृक्षांना गरजेनुसार टँकरमार्फत मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो. सन 2012 पासून आठवड्याच्या दर रविवारी वृक्ष संवर्धनासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबिवले जात आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात रोपे पाण्याअभावी नष्ट होऊ नयेत, याकरीता पिंपळे गुरव मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टकडे मागणी केल्यास या रोपांना टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जातो.
या वृक्षारोपण कार्यक्रमास भैरुजी मंडले, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे यांचे योगदान लाभले.










