न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ : शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या संकल्पनेतून मावळ लोकसभा मतदार संघातील मावळ, पिंपरी, चिंचवड या तीन विधानसभा मतदार संघामध्ये शिवसंपर्क अभियान सुरु आहे. या शिवसंपर्क अभियानामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी, विधानसभा प्रमुख, संघटक, समन्वयक, नगरसेवक, उपशहर प्रमुख, महिला आघाडी उपशहर संघटक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना शहर अधिकारी, भा. वि. सेना शहर संघटक, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी पदाधिकारी व आजी माजी पदाधिकारी यांच्या सूचना, संकल्पना समजून घेण्यासाठी बैठका घेण्यात आली.
शिवसंपर्क अभियानाची सुरुवात गुरुवार दि. २३ ऑगस्ट २०१८ कार्ला येथे एकविरा देवीमातेचे दर्शन घेऊन झाली. मावळ तालुका विधानसभा क्षेत्रामध्ये आठ दिवस शिवसंपर्क अभियान उत्साहात यशस्वीरित्या संपन्न झाले आहे. त्याच पद्धतीने पिंपरी व चिंचवड विधानसभा क्षेत्रातील नियोजन करण्यासाठी दि ३१/०८/२०१८ रोजी दुपारी ०२.०० वाजता शिवसेना भवन, आकुर्डी येथे बैठक संपन्न झाली.
यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मार्गदर्शन करताना पक्ष प्रमुख सन्मानिय उद्धवजी ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली व संघटनेला आवाहन केले आणि सर्व स्तरावर संघटना मजबूत करून कामास लागा असा आदेश दिला आहे. त्याला अनुसरून आपली संघटना मजबूत करा नागरिकांच्या अन्यायाला वाचा फोडा, जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरा सत्ताधाऱ्याच्या चुकीच्या कामाला विरोध करा व घराघरात शिवसेनेने केलेली कामे पोहचवा. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून वार्डात, प्रभागात शिवसेनेचे अस्तित्व असे निर्माण करा की गोर गरिबांना शिवसेनेशिवाय पर्याय राहिला नाही पाहिजे.
शहर प्रमुख योगेश बाबर यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या वाटचालीवर जोर दिला व संघटना मजबूत करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. शहर संघटिका सुलभा उबाळे यांनी मनोगत व्यक्त करताना महिला संघटन किती महत्वाचे आहे व त्याकरिता सर्वाना सामावून महिलांचे संघटन बळकट करणार असल्याचे आणि महिलांच्या ज्वलंत प्रश्नावर व अन्यायाविरुद्ध आंदोलने करणार असल्याचे नमूद केले.
जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी शिवसंपर्क अभियानाची धुरा सांभाळत म्हणाले कि, ते या पूर्ण अभियानात सहभागी होणार असून मार्गदर्शन करणार आहेत व वेळेच्या नियोजनानुसार शिवसेनेचे खासदार, आमदार व नगरसेवक हे देखील सहभागी होणार आहेत. त्यांनी शिवसंपर्क अभियानामध्ये त्या त्या परिसरातील नागरिकांनी केलेल्या सूचना व समस्या व पालिकेत होत असलेला भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाची होत असलेली शासकीय कामे त्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे नमूद केले. तसेच शिवसैनिकांच्या अडचणी लक्षात घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन शिवसेना पक्षबांधणी व आंदोलने याबाबत दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका सुलभा उबाळे, मधुकर बाबर, कार्यालयीन प्रमुख बशीर सुतार, सावल तोतानी, खंडू शिरसाठ, विजय जम, सोनू शिरसाठ, मानसिंग मोरे, प्रदीप पऊजा, प्रकाश म्हस्के, गणेश राकडे, श्रीमंत गंगाधर गिरी, नगरसेवक प्रमोद कुटे, अॅड.सचिन सुरेश भोसले, माऊली जगताप, रुपेश एकनाथ कदम, भाविक देशमुख, शरद जगदाळे, पार्थ रमेश गुरव, राजेश वाबळे, अक्षय बाळासाहेब जगताप, गोरख पाटील, फारुख शेख, दादासाहेब मोहिते, सय्यद अमिन पटेल, राम पात्रे, सोनू संधू, सुरेखा उदावंत, आर.एम.कदाडी, शेखर महाडिक, अमोल निकम, नवनाथ तरस, सौ.विजया चव्हाण, सौ.विद्या जाधव, सौ.विमल जगताप, सौ.अनिता तुतारे, सौ.कमल गोडांबे, सौ.सुशीला पवार, सौ.मंगल सुरेश काळंगे, सौ.पुष्पा तारू, सौ. नूरजहाँ शेख, हरेश आबा नखाते, अंकुश कोळेकर, गणेश वायभट, गोरख पाटील, प्रदीप दळवी, सौ.वैभवी घोडके, सौ.वैशाली कुलथे, सौ.शारदा वाघमोडे, सौ.बेबी जाकीर सय्यद, राजू सिद्राम सोलापुरे, गजानन महादेव धावडे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.










