न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या प्रभाग क्र. २५ मध्ये आवश्यक ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकणे, वॉल्व बसविणे तसेच इतर आवश्यक कामे करण्यात येणार असून याकामी ६१ लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र.१४ मधील चिंचवड स्टेशन रामनगर, परीसरातील महापालिका शाळा इमारतींची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी ४१ लाख रुपये खर्च होईल. प्रभाग क्र.७ मधील भोसरी येथील स.नं.१ मध्ये प्रेक्षक गॅलरी संदर्भात उर्वरीत कामे करणे आणि मैदान विकसित करण्यासाठी ७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या विषयांसह तरतूद वर्गीकरणाच्या तसेच महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली.


















