न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- काळेवाडी येथील अनधिकृत बांधकामांवर (दि. ५) रोजी महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय यांनी संयुक्तिक कारवाई केली. या कारवाईमध्ये ६ आर.सी.सी. व ७ पत्राशेड असे एकूण अंदाजे ३१४८.०० चौ.मी. अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे
आणि बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या नियंत्रणाखाली करण्यात आली. उप अभियंता विनायक माने, कनिष्ठ अभियंता सुशीलकुमार लवटे, धडक कारवाई पथकातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच २० मनपा पोलिस कर्मचारी व वाकड पोलीस स्टेशन ०२ पोलीस निरीक्षक ०३ पोलीस उपनिरीक्षक, १० पोलीस कॉन्स्टेबल कर्मचारी, महाराष्ट्र पोलिस सुरक्षाबल २६ कर्मचारी, ३ जेसीबी तसेच १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.


















