न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- ‘बाळासाहेबांची शिवसेने’चा पिंपरी-चिंचवड शहरातील पहिला मेळावा बुधवार (७ डिसेंबर) रोजी आयोजित करण्यात आला आहे. चिंचवडमधील ॲटो क्लस्टर सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता हा मेळावा होणार आहे.
खा. श्रीरंग बारणे मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यामध्ये मावळ, पिंपरी आणि चिंचवडमधील पदाधिकारी घोषित केले जाणार आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार बारणे हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.


















