न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर :- पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने श्री गणेशाचे वाजत गाजत मोठ्या थाटात सातच्या दिवशी विसर्जन करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी गेली सात दिवस श्री गणेशाची मनोभावे सेवा केली. बुद्धिदेवताला प्रसन्न केले. सातव्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी विसर्जन घाटापर्यंत गणेशाची ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक काढली.
यानंतर गणेशाची आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या घोषणेने परिसर दणाणून सोडला होता. यावेळी संस्थेचे संस्थापक जगन्नाथ काटे, मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका सविता आंबेकर, संगीता पराळे, शिक्षिका, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.