न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : सत्ताधारी भाजपने “डिजिटल इंडिया” ही चुनावी घोषणा महापालिकेच्या प्रयत्नातून सत्यात उतरवण्याकरिता एक पाऊल पुढे टाकले आहे. नागरिकांना शहरातील विविध विकासकामांची माहिती व्हावी याकरिता ‘पिंपरी-चिंचवड महापालिका-वन’ हे अॅप विकसित केले आहे.
त्याद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा नियोजन, शहराच्या विकासकामांची माहिती, उत्सावादरम्यान कुठले रस्ते बंद असणार आहेत, वाहतूक कोठून वळविली आहे याची अगदी इत्थंभूत माहिती मिळणार आहे.
याकरिता प्ले स्टोअरमधून हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. तसेच हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करूनही डाउनलोड करता येईल. https://play.google.com/store/apps/details?id=com.workapps.knowledge.pimpriChinchwadOne
या अॅपचा वापर पालिकेने बुधवारपासून सुरु केला असून महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते या अॅपचे अनावरण झाले. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका भीमाबाई फुगे, निर्मला गायकवाड, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आदी उपस्थित होते.
या अॅपच्या माध्यमातून आवाहन करायचे असल्यास या अॅपद्वारे केले जाईल. आजारांबाबत जनजागृती केली जाईल. शहरामध्ये होणा-या घडामोडीची माहिती तातडीने नागरिकांना या अॅपद्वारे मिळणार आहे तसेच नागरिकांना आवश्यक माहितीचे प्रसारण, संदेश, परिपत्रक, निवेदन इत्यादी स्वरुपाची सर्व माहिती एकाच अॅप द्वारे सहजरित्या उपलब्ध होणार आहे.
‘पिंपरी-चिंचवड-वन’ मोबाईल अॅप द्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी शहरांची संपुर्ण माहिती, चित्रफित, संदेश, तसेच कोणतीही तातडीची माहिती अॅप द्वारे शोधता येईल. या अॅप मध्ये माहितीचे विविध विषयवार स्वतंत्र भाग केले असून त्याबाबतचे नवे अपडेट त्या भागामध्ये विषयवार समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचा महापालिकेने वापर सुरु केला असून पोलीस देखील त्याचा उद्यापासून वापर सुरु करणार आहेत असे आयुक्त हर्डीकर म्हणाले.