न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी प्रतिनिधी :- शिवसेना रहाटणी – काळेवाडी विभागाच्या वतीने मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या त्या विधानाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका कार्यक्रमात ”शाळांनी सरकारकडे पैशाची भिक मागू नये” असे जाहीर वक्तव्य केले होते. वास्तविक पाहता भारतातील सर्व बारा-बलुतेदार समाजाला शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे, परंतु सरकारची भूमिका ही अशैक्षणिक तर आहेच, परंतु ती गरीब व बहुजन मागासवर्गीयांच्या विरोधात आहे, असे शिवसेना तिरोडा-गोंदिया मतदारसंघाचे संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.
देशात लाखो शाळा, महाविद्यालये विना-अनुदानीत आहेत. करोडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जर सरकारी मदत थांबवली तर गरीबांचे वाईट हाल होतील हे उघड सत्य आहे. म्हणुन आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की, आपण शिक्षणासाठी महाविद्यालये व शाळांना आर्थिक मदत करून शिक्षणाचा दर्जा व उंची वाढवावी असे आवाहन दाखले यांनी केले आहे.