न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे :- सरकारने डीजेला परवानगी दिली नाहीतर आम्ही सरकारचं विसर्जन करू, असा इशारा पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
सरकारने सार्वजनीक ठिकाणी डीजे आणि डाॅल्बीला बंदी घातली आहे. त्यामुळे पुण्यात गणेश मंडळांनी या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. सरकारने जर डीजेला परवानगी दिली नाहीतर आम्ही मुर्तीचं विसर्जन करणार नाहीत, असा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे.
दरम्यान, सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे हिंदूवर अन्याय आहे, त्यामुळे सरकारच्या अशा निर्णयाला आम्ही भीक घालणार नाहीत, असंही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं.