न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बीड :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आगामी निवडणुकांचे रणशिंग मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून फुंकणार असल्याचं बोललं जातंय. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत.
शरद पवारांचा 30 सप्टेंबरला बीडमध्ये मुक्काम आहे. त्यानंतर 1 तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचा विजय संकल्प मेळावा बीडमध्ये होणार आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संकल्प मेळावा महत्वाचा मानला जातोय.
दरम्यान, बीड येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर हा मेळावा होणार असून यासाठी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित व प्रकाश सोळंके जोरदार तयारीला लागले आहेत.