न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- ”आज गणेश विसर्जन” या सोहळ्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचड पोलीस आयुक्तालय सज्ज झाले असून शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील पिंपरी, थेरगाव आणि चिंचवड या महत्वाच्या ठिकाणावरील घाटांवर आणि मिरवणूक मार्गांवर ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यांचा वॉच असणार आहे.
महापालिकेच्यावतीने गणेश विसर्जनासाठी शहरातील या 26 घाटांवार विसर्जनाची सोया करण्यात आली आहे.
सांगवी आहिल्याबाई होळकर घाट, सांगवी वेताळबाबा मंदीर घाट, कासारवाडी स्मशानभूमी जवळील घाट, फुगेवाडी, स्मशानभूमीजवळील घाट, बोपखेल घाट, पिंपरीगांव, स्मशानभूमीजवळील घाट, गणेश तलाव, प्राधिकरण तळे, वाल्हेकरवाडी, जाधव घाट, रावेत घाट, जलशुध्दीकरण केंद्र, किवळेगांव घाट, स्मशानघाट, रावेत, भोंडवेवस्ती घाट, थेरगांव पूल नदीघाट, मोरया गोसावी, चिंचवड नदीघाट, केशवनगर, चिंचवडघाट, ताथवडे, स्मशानभूमी जवळील घाट, पुनावळे गांव, राममंदीर घाट, वाकड गावठाण घाट, कस्पटेवस्ती घाट, फुगेवाडी, स्मशानभूमीजवळील घाट, बोपखेल घाट, पिंपरीगांव, स्मशानभूमीजवळील घाट, काळेवाडी स्मशानभूमीजवळील घाट, पिंपळेगुरव घाट, काटेपिंपळे घाट क्र.1, सुभाषनगर घाट, पिंपरी. पिंपळेनिलख घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशानभूमी जवळील घाट.
प्रशासनाच्यावतीने सर्व गणेशभक्तांना अग्निशामक दलाचे कर्मचारी, क्रीडा विभागाचे जीव रक्षक, सुरक्षा विभागाचे कर्मचारी तसेच काही स्वयंसेवी संस्था, सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश विसर्जनासाठी काही मार्गदर्शक सूचना
विसर्जन करताना खोल पाण्यात उतरु नये
घाटावरील विसर्जन हौदांचा वापर करावा
निर्माल्य नेमून दिलेल्या जागी टाकावे
पोलीस व शासकीय यंत्रणांचे नियमन करावे.
न्यायालयाच्या डीजे बंदीचे सर्व गणेश मंडळांनी पालन करून विसर्जनासाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा असे आवाहन पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास गणेश मंडळांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे पोलिसांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.










