न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी प्रतिनिधी : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपला बालेकिल्ला पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेण्याचे सत्र सुरु केले आसल्याचे पहावयास मिळाले.
अजित पवार यांनी शहरातील आकुर्डी येथे सरप्राईज व्हिजिट केली. यावेळी मा. नगरसेवक निलेश पांढरकर यांच्या कार्यालयास भेट दिली. तसेच त्यांच्या शुभहस्ते येथील शिवशक्ती मित्र मंडळाच्या गणपतीची आरती केली.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, मा. नगरसेवक निलेश पांढरकर, राजू मिसाळ, ज्ञानेश्वर भालेराव, प्रतिभा भालेराव, राजेंद्र साळुंके व शिवशक्ती गणेश मंडळाची कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.










