न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली प्रतिनिधी : आमदार महेशदादा लांडगे युवा मंच व स्वी. नगरसेवक दिनेश यादव आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून चिखलीतील नागरिकांकरिता मोफत चारचाकी वाहन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
याकरिता नागरिकांनी आपले आधार कार्ड, शाळा सोडल्याच दाखला व स्वतःचा एक फोटो ही आवश्यक कागदपत्रे घेऊन सकाळी १० ते ७ यावेळेत चिखलीतील तलाठी ऑफिससमोरील कार्यालयात जमा करावीत. अधिक माहितीकरिता ९९२२९६४८३८ या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधण्याचे आवाहन दिनेश यादव यांच्या वतीने करण्यात आले आहे.