न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी प्रतिनिधी : राज्य सरकारने अत्यंत घाईने व सूडबुद्धीने राज्य परिवहन विभागातील एकूण ३७ मो. वा. निरीक्षक व सहाय्य्क मो. वा. निरीक्षक यांना उच्च न्यायालयाच्या आदेशावरून निलंबित केले आहे.
याचा निषेध नोंदवण्याकरिता पिंपरी-चिंचवड मो. वाहन चालक-मालक प्रतिनिधी संघ व वाहन सल्लागार संघटनेच्यावतीने आज रोजी (दि. २४. सप्टें.) एक दिवसीय कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
आज पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज थांबवून सर्व सदस्य व सभासद यात सामील होणार आहेत व एक दिवसीय कडकडीत बंद पाळणार आहेत असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील आज रोजीचे कामकाज उद्या मंगळवारी पूर्वरत चालू होईल, असे म. रा. वा. चा. मा. प्र. महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे व पिं. चिं. वा. चा. मा. प्र. संघटनेचे अध्यक्ष शांताराम वायकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.