- व्हरांड्यात झोपण्याची येतेय वेळ; निवारा केंद्राच्या इमारतीत सोय करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२४) :- पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जिल्ह्यातील आणि बाहेरील रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबिय देखील असतात. त्यांच्यावर रुग्णालयातील व्हरांड्यात झोपण्याची वेळ येत आहे. तसेच रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर देखील सेवा बजावत असतात.
रुग्णाच्या नातेवाईकांना आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी रुग्णालयासमोरच निवारा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या निवारा केंद्राच्या इमारतीचे बांधकामदेखील पुर्ण झाले आहे.
त्यामुळे त्या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांना आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शहर भाजपचे सचिन काळभोर यांनी पालिकेकडे केली आहे.











