न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२४) :- साऊथ अफ्रिका लीग २०२४ मालिकेत प्रेटोरीया कॅपीटल्स विरुद्ध डरबन सुपर जायन्स या क्रिकेट सामन्यावर आरोपीने मोबाईल फोनद्वारे बोली स्विकारत बेटींग घेतली.
१२,००० चा एक काळ्या रंगाचा गॅलक्सी नोट टेन लाईट सॅमसंग मोबाईल हँडसेट सह व रोख रक्कम रु २००० सह आरोपी मिळून आला. हा प्रकार (दी. दि. १८) रोजी रात्री १०.२० च्या सुमारास हॉटेल सलोनी, पिंपरी मार्केट, पिंपरी, साईचौक जवळ सार्वजनिक रोडवर निदर्शनास आला.
आरोपी अनिल घनशामदास रोहरा (वय ३४ वर्षे) याच्या विरोधात पिंपरी पोलिसांनी ४५/२०२४ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ), इंडियन टेलीग्राफ अॅक्ट कलम २५ (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोहवा हांडे पुढील तपास करीत आहेत.


















